14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रसत्तेचा माज, आता मतदारांची अवहेलना

सत्तेचा माज, आता मतदारांची अवहेलना

मुंबई : प्रतिनिधी
सत्तेचा माज काय असतो हे सध्या नेत्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर वेगळा सांगण्याची गरज उरलेली नाही. आधी मतदारांच्या हाता पाया पडणारे आता मतदारांनाच शिव्या घालताना दिसत आहेत.
लोकसभेप्रमाणे विधानसभेत पराभव वाट्याला येऊ नये म्हणून अजितदादांनी काय नाही केले? पायाला भिंगरी लावून बारामती पालथी घातली. मतांसाठी बारामतीसमोर पदर पसरला. लोकसभेत ताईला जिंकवले, आता मला जिंकवा असे म्हणताना कधी दादांचा कंठ दाटला तर कधी दादांचा रुद्रावतार दिसला. हे सर्व विधानसभा निवडणुकीआधीचे, उपमुख्यमंत्री होण्याआधीचे अजितदादा. विधानसभा निकालानंतर अजितदादा युरोपची हवा खाऊन आले, जर्मनी फिरून आले. महाराष्ट्रात परतल्यानंतर मतदारांना हिटलरच्या सुरात जाब विचारू लागले. मला मतदान केले म्हणजे मालक झाला का? अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्याला फैलावर घेतले.
मतदारांना वेश्याची उपमा
मतदारांना यूज अँड थ्रोची गोष्ट समजण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी अजितदादांनाही मागे पाडल्याचं दिसले. आपण निवडून दिलेला आमदार एवढा शिवराळ आहे, हे समजल्यानंतर काही मतदारांनी देखील मनातल्या मनात भ आणि म चा पाढा सुरू केला असेल. दोन दोन हजारात विकले गेले साले, यांच्यपेक्षा वेश्या ब-या अशी मतदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली ती संजय गायकवाडांनी. स्वत: लोकशाहीचा बाजार मांडणा-या या नेत्यांची, मतदारांना वेश्यांच्या पंक्तीत बसवण्याची हिंमत होतेच कशी? याला सत्तेचा माज नाही तर दुसरं काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नितेश राणेंनी मतदारांना
थेट दहशतवादी म्हटले
राष्ट्रवादीचे अजितदादा, शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या गटात बसणारे आणखी एक नाव म्हणजे भाजपचे नितेश राणे. त्यांनी प्रियंका गांधींना खासदार करणा-या केरळच्या मतदारांना थेट दहशतवादी म्हटले होते. नेत्यांची जीभ जरी चुरूचुरू चालत असली तरी तिला लगाम घालण्याची ताकद मतदाराच्या एका बोटात आहे हे त्यांनी विसरू नये. सुज्ञास जास्त सांगणे न लगे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR