23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसत्संग प्रतिष्ठानच्या सेवेची वारी पांडुरंगाच्या दारी

सत्संग प्रतिष्ठानच्या सेवेची वारी पांडुरंगाच्या दारी

लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने वारक-यांना पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोफत एसटी बससेवा उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या २३ वर्षांपासून हा उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असून यंदा या सेवेचे २४ वी वर्ष आहे. सत्संग प्रतिष्ठानच्या सेवेची वारी पांडूरंगाच्या दारी जात असून आतापर्यंत या उपक्रमांतर्गत हजारो वारक-यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. श्री सत्संग प्रतिष्ठानची मोफत पंढरपूर यात्रा आज दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानकातून निघणार आहे.

आषाढी वारी व विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेले लाखो भाविक आहेत. परंतू, सर्वांनाच स्व खर्चाचे पंढरीला जाणे शक्य होत नाहीत, अशा भाविकांना येथील सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने मोफत यात्रा तसेच भोजन सेवा देण्यात येत आहे. या वर्षीच्या यात्रेसाठी ३१ एसटी बसेसची सोय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून सुमारे दीड हजार वारका-यांना मोफत पंढरपूर यात्रा घडणार आहे. भाविक-भक्तांना, वारक-यांना विठ्ठलाचे दर्शन घडविण्याची सेवा सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे.

पंढरपूर आषाढी वारी वारकरी मोफत यात्रा व भोजन सेवा देऊन वारकरांना पंढरपूला वारीसाठी रवाना करण्याकरीता आज दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते वारक-यांना पंढरपूला रवाना केले जाणार असून यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंंचे अध्यक्ष कैलास राठी उपस्थित राहणार आहेत.

सत्संग प्रतिष्ठनच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारिख, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भूतडा, दत्ता लोखंडे, जुगलकिशोर झंवर, शाम मुंदडा, केतन हलवाई, बालाजी बारबोले, रमेश राठी, दिलीप माने, निलेश ठक्कर, मकरंद सावे, लक्ष्मण मोरे, सीए प्रकाश कासट, अशोक गोविंदपूरकर, शैलेश लाहोटी, अ‍ॅड. बळवंत जाधव, रामानूज रांदड, रमेश बियाणी, लक्ष्मीकांत सोमाणी, भरत चांडक, राजा मणियार, अशोक भोसले, राजकुमार मालपाणी, बालकिशान मुंदडा, द्वारकादास मंत्री, नंदकिशोर अग्रवाल, मधुसूदन भुतडा, छोटू गडकरी, गोवर्धन भंडारी, जगदिश भूतडा, दिलीप रांदड, अशोक अग्रवाल, संभाजी सूळ, उदय चौंडा, रामदास पवार, किरण मंत्री, जुगल बाहेती, राम कोंबडे, संजय लड्डा, सुरेश मालू, अशोक लोया आदींनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR