22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
HomeUncategorizedसभासद, खातेदार, ठेवीदारांचा विश्वास म्हणजेच मनोरमा परिवार : हर्षवर्धन पाटील

सभासद, खातेदार, ठेवीदारांचा विश्वास म्हणजेच मनोरमा परिवार : हर्षवर्धन पाटील

 सोलापूर : हर्षवर्धन पाटील हे अभ्यासू मंत्री आहेत. अतिशय चौकस बुद्धी आणि खोलामध्ये जाऊन विचार करणारे, सहकार धर्म, माणुसकी धर्म जपणारे म्हणजेच हर्षवर्धन पाटील अशा शब्दात त्यांचे कौतुक करीत आईच्या आठवणींनी मनोरमा परिवार पुढे जात आहे. आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो. त्याच बळावर आज परिवार दोन हजार कोटींकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मनोरमा बँकेच्या आठव्या जोडभावी पेठ शाखेचे ऑनलाईन उद्घाटन हॉटेल बालाजी सरोवर सोमवारी सायंकाळी झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंच अध्यक्षा शोभा मोरे, डॉ. सुमित मोरे, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन अ‍ॅड. सुरेश गायकवाड, माजी आमदार धनाजी साठे, मधुकरराव चव्हाण, राजन पाटील, दिलीप माने, जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव,‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील, ‘सहकार शिरोमणी’चे चेअरमन कल्याणराव काळे, सीताराम शुगरचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशात ५४२ साखर कारखाने साखर फेडरेशन संघात आहेत. ७ कोटी शेतकरी साखर कारखानदारीशी जोडलेले आहेत. ५० हजार कोटींच्या वर उलाढाल आहे. आतापर्यंत३२ कोटींची मदत वाटप झालेली आहे. अजून ५० हजार कोटी मिळतील. तसेच सभासद, कर्जदार, ठेवीदार, नागरिकांचा विश्वास म्हणजेच मनोरमा परिवार आहे. आज एका महिन्यात मनोरमा बँकेच्या जोडभावी पेठ शाखेने २५ कोटींच्या ठेवी जमा केल्या आहेत. त्या केवळ परिवारातील विश्वासामुळेच. छोट्या – मोठ्या व्यवसायाला आर्थिक बळ देण्याचे काम मनोरमा बँक करीत आहे. त्यांच्या या नव्या शाखेला माझ्या शुभेच्छा.
यावेळी २५ हजार रुपये भरून शेअर्स घेतलेल्या सभासदांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.   शोभा मोरे यांनी स्वागत केले.  अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन संतोष सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी सीईओ शिल्पा कुलकर्णी – मोहिते, सर्व संचालक, खातेदार, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR