बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे, खंडणी प्रकरणावरूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे, दमानिया यांनी ट्विट करून वाल्मिक कराड याच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत.
वाल्मिक कराड याला अनेकांनी समाजसुधारक असे संबोधले आहे. यावरून दमानिया यांनी समाजसुधारक वाल्मिक कराड याचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. या ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. वाल्मिक कराड याची केज, वडवणी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनशॉप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव ५ कोटी इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे.