25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

वाशिम : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाजा नजीक उभ्या असलेल्या केमिकलच्या ट्रकला मागील दिशेनं आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही ट्रक जळून खाक झाले. ही घटना आज पहाटे ४ वाजाताच्या दरम्यान घडली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून चालक आणि क्लिनर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझा जवळ बिघाड झाल्यानं पेंट केमिकल घेऊन जाणारा ट्रक उभा होता. यादरम्यान मागील बाजूनं मुंबईवरुन झारखंडकडं जाणा-या ट्रॅकनं उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामुळे स्पार्किंग होऊन दोन्ही ट्रकनं पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच कारंजा नगर परिषद अग्निशामक दल तसंच समृद्धी महामार्ग अग्निशामक दल, शिवणी टोल प्लाजा अग्निशामक दल, वनोजा टोल प्लाजा अग्निशामक दल यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु उभ्या असलेल्या ट्रकमध्ये केमिकल असल्यानं स्फोट होत असल्यामुळं जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR