सोलापूर : तुळजापुरात देवी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने ते पंढरपूरकडे रवाना होतील.
सव्वा बारा वाजता श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर मंदिराकडे जाणार आहेत. पावणे तीन वाजता श्रीलक्ष्मी-नरसिंह मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शनानंतर पावणे चार वाजता ते हेलिकॉप्टरने बारामती विमानतळाकडे रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.