22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसाता-यात झळकले शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर

साता-यात झळकले शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर

सातारा : प्रतिनिधी
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अतिशय चुरशीची लढत झाली. महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची टक्कर झाली आहे. मतदानानंतर लोकांमध्ये सातारा लोकसभेमधून कोण जिंकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशा वेळी खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामार्गालगतच लावलेल्या या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सातारा लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यापासूनच मोठी चुरस निर्माण झाली होती. मुळातच महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. जिल्ह्यातील हे दोन्ही उमेदवार एकास एक असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.

अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र या परिस्थितीत खंडाळा तालुक्यात महामार्गालगत शशिकांत शिंदे खासदारपदी विजयी झाल्याचे अभिनंदनपर बॅनर लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने त्यांनी निकालापूर्वीच हे बॅनर लावलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ व त्यांच्या सहका-यांनी हे बॅनर झळकवले आहेत.
त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या सर्वच सातारावासीयांचे लक्ष वेधले जात आहे. लोकसभा निकालाला अजून दहा दिवसांचा अवधी असतानाच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच खंडाळ्यात विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. सध्या तालुक्यात हाच विषय लक्षवेधक ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR