सोलापूर : समाजसेवक सादिक नदाफ यांना राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अॅवार्डने गोवा पणजी येथे सन्मानित करण्यात आले.
पणजी गोवा येथे ज्ञान रचना सोशल फाउंडेशन च्या वतीने समाजसेवक सादिक नदाफ यांना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधान परिषद अध्यक्ष रमेश तळवलकर व मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत तसेच सारिका शेलार डायरेक्टर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन प्रवीण साळवे ,विनय सिंधुताई सपकाळ , ममता सिंधुताई सपकाळ व सुप्रिया चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातून समाजसेवक सादिक नदाफ यांना सन्मानित करण्यात आले.मानाचा फेटा गोल्ड मेडल ट्रॉफी संविधान व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.