32.2 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसोलापूरसाने गुरुजी पतसंस्थेच्यावतीने सभासदांचा सत्कार

साने गुरुजी पतसंस्थेच्यावतीने सभासदांचा सत्कार

सोलापुर : पतसंस्थेत आपण जितक्या हक्काने आपण कर्ज घेतो तितक्याच जबाबदारीने कर्जाची परतफेड करणे हे सभासदांचे कर्तव्य आहे.वेळेवर कर्ज फेडल्यास पतसंस्थेची आर्थिक स्थिती सुधारते.त्यामुळे पतसंस्थेची पत वाढवणे सभसदांच्या हाती आहे.असे मत शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश काळे यांनी व्यक्त केले.

साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्यावतीने पुरस्कारप्राप्त व पदोन्नती झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम समाजकल्याण केंद्रात पार पडला .यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आप्पासाहेब पाटील,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,अ.गफुर अरब,भिमराया कापसे आदी उपस्थित होते.पतसंस्थेच्या आर्थिक धोरणची व राबविण्यात येणार्‍या विविध योजना व ऊपक्रमांची माहिती सुनिल चव्हाण यांनी करुन दिली.पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सभासद शिक्षकांना विविध संस्था,संघटना व सामाजिक संघटनेमार्फत पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे सचिव,अप्पाराव इटेकर,संचालक विरभद्र यादवाड,धनाजी मोरे,उल्हास बिराजदार,शिवानंद हिरेमठ,महादेवी पाटील,फरजाना रचभरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन चौधरी यांनी तर मुरलीधर कडलासकर यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR