22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरसामाजिक सलोखा, शांतीसाठी अल्लाहकडे दुआ

सामाजिक सलोखा, शांतीसाठी अल्लाहकडे दुआ

शिरुर अनंतपाळ  : प्रतिनिधी
त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा दिवस म्हणजेच ईद-उल-अजÞहा बकरी ईद शहरासह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आली. बकरी ईद च्या नमाजनंतर देशात सामाजिक सलोखा व जगाच्या शांतीसाठी अल्लाह कडे दुआ मागण्यात आली.
   शहरासह तालुक्यातील गावामध्ये सोमवार सकाळी ८.३० वाजता ईद ची नमाज अदा करण्यात आली. ईस्लाम धर्म हा शांतता प्रिय असून ईस्लाम धर्माने कुराणद्वारे दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकांनी जीवन जगावे, अमन, शांतता व भाईचारा यम ठेवावे, असे ही धर्मगुरूनी सांगितले.  दरम्यान बकरी ईद म्हणजेच ‘ईद-उल-अज्हा’  मुस्लीम समाजात ईस्लामी कालगणनेच्या शेवटचा महिना जिलहज्जच्या १० तारखेला त्याग व बलिदानाचे शिकवण देणा-या या ईदची नमाज शहरासह तालुक्यात ईदगाह व मशिदमध्ये पार पडली. शहरात रजियोद्दीन जाहगीरदार, उजेड येथे हाफीज उस्मानसाब शेख, येरोळ येथे मौलाना ईब्राहिम सहाब बोरोळे, हाफीज अनस मौलाना, साकोळ येथे मौलाना खय्युम बागवान, हिप्पळगाव येथे हाफीज शाहिद शेख यांनी नमाजचे पठन केले.व सर्व बांधवांनी अल्लाह चरणी नतमस्तक होवून पैगंबरांनी सांगितलेल्या नियमांनुसार जीवन जगावे,असे धर्मगुरूनी सांगितले.
      बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचा महत्वाचा सण असल्याने यादिवशी बक-यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. हजरत ईब्राहिम अलैही सलाम व त्यांचे पुत्र हजरत ईस्माईल अलैही सलाम यांच्या त्याग व बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ बकरी ईद हा सण साजरा करण्यात येत असून या ईद द्वारे त्याग, समर्पण, कर्तव्यभावनेचे शिकवण दिली जाते.नमाज अदा केल्यानंतर  लहान,थोर,ज्येष्ठ बांधवांनी एकमेकांना अंिलगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.एकूणच शहरासह साकोळ, उजेड, येरोळ, हिप्पळगाव,सय्यद अकुलगासह तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
फोटो २४

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR