निलंगा : प्रतिनिधी
लातूर जहीराबाद निकृष्ट दर्जाच्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व यातील दोषीवर कडक कार्यवाई करण्यात यावी. या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पानंिचंचोली ते औराद शहाजानी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या परक्रिमेचा शुभारंभ दि २८ जून रोजी करण्यात आला.
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अल्पावधीतच महामार्गावर पडलेल्या भेगा, खड्डे व जंिम्पगमुळे अनेकांचे बळी गेले. यात शेकडो जण अपंग झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरील भेगा, खड्डे व पुलाच्या ठिकाणी जंिम्पग असल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर साधारणत: दीडशे निष्पाप जणांचा बळी व शेकडो जणांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरील भेगा ,खड्डे व जंिम्पग तात्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या प्रवासाचा मार्ग सुखकर करावा व यातील दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील पानंिचचोली ते औराद शहाजानी दरम्यान परिक्रमा करून यातील मयत व जखमी झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वाक्ष-या घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे. याकरिता या परिक्रमेचा पानंिचंचोली येथून शुभारंभ करण्यात आला. दरम्यान ही परिक्रमा पानंिचचोली, गौर , आनंदवाडी , मसलगा या गावात करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरंिवद भातांब्रे, तालुका कार्याध्यक्ष अॅड. नारायण सोमवंशी, राठोड्याचे माजी सरपंच पंकज शेळके, बसपुरचे चेअरमन गंगाधर चव्हाण, आंबेगावचे चेअरमन प्रमोद मरूरे, माजी प.स. सदस्य महेश देशमुख, वळसांगवीचे सरपंच विठ्ठल पाटील, माजी सरपंच श्रीकांत साळुंके, तुळशीदास साळुंके, एड तिरुपती शिंदे, शकील पटेल, निलंगा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, अमोल नवटक्के, अपराजित मरगणे, धनाजी चांदुरे, बालाजी पाटील, भगवान पाटील , पिरसाब सय्यद, बब्रुवान जाधव, माधवराव पाटील, राम बिरादार , तुकाराम चामे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.