21.7 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रसावंत-केसरकरांची भेट शिंदेंनी नाकारली, मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे धाव

सावंत-केसरकरांची भेट शिंदेंनी नाकारली, मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे धाव

मुंबई : शिंदे सरकारमधील शिवसेनेच्या दोन नेत्यांन फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळणार नसल्याचं समोर आलेय. तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा केल्याचं समजते. सुरूवातीला शिंदेंकडून या दोन नेत्यांची भेट नाकारण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या दोघांचा पत्ता कट होऊ शकतो. शुक्रवारी पाच तास वर्षा बंगल्यावर थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंर्त्यांना नाराज होऊन परतावे लागले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता एकनाथ शिंदेंसोबत या दोन नेत्यांची भेट झाली. मात्र या दोन्ही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?
रविवारी होणा-या मंत्रिमंडळ विस्ताराआधी सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्­यांना भेटण्यासाठी शिवसेना नेत्यांनाही गर्दी केली होती. तानाजी सावंत, दीपकर केसरकर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असलेले आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग
शिवसेनेमध्ये मंत्रि­पदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे. इच्छुकांची संख्या जास्त आहे, मंत्रि­पदे कमी आहेत, त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली आहे. शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेह-यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR