24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरसावधान! धाब्यावरील मद्यपींवर होणार कारवाई

सावधान! धाब्यावरील मद्यपींवर होणार कारवाई

लातूर : प्रतिनिधी

नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान धाब्यावर मद्यप्राशन केल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत अवैद्य मद्य वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे अवैद्य मद्य वाहतूक व विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहे.

गुन्हा अन्वेषण व्यतिरिक्त हातभट्टी मुक्त करण्यासाठी प्रत्येक अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जावचून हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत गावात ग्रामसभा घेण्याबाबतचे पत्र देण्यात आल. सर्व खेडोपाडी जावून गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देवून हातभट्टी दारु निर्मित करणारे, वाहतूक करणारे व विक्री करणा-या इसमांची व ठिकाणांची माहिती देण्याबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १३४ ची नोटीस देण्यात आल्या व हातभट्टी समुळ उच्चाटन करण्यासाठी गावे दत्तक घेतली आहेत. या कारवाईमध्ये लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक आर.एम. जाधव, एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्नील काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. जाधव, गणेश गोले, निलेश गुणाले, मंगेश खारकर तसचे जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदविला.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांक अथवा लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणा-यांचे नांव गुप्त ठेवले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR