सोलापूर : एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रम तिर्गत १ ते १५ जानेवारी या कालावधीत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन पंधरवडा राबविण्यात आला असून त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये ही राबविण्यात आला. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद वाचन कौशल्य कार्यशाळा, लेखक विद्यार्थी संवादपुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा असे उपक्रम घेण्यात आले.
नवीन वर्षाची सुरुवात समाजातील सर्व घटकांमधील तसेच नागरिकांनी आपल्या आवडीचे पुस्तकाचे वाचन करून करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत्यानुसार राज्यातील सहा हजारांहून अधिक महाविद्यालयांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. राज्यातील ४५
लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले होते. इंटरनेट वरची सर्वच माहिती खरी नसते खरी माहिती तुम्हाला ग्रंथालयात उपलब्ध असते, त्याचा वापर करुन जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे, असे आवाहन उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. प्रदीप तापकीरे, डॉ. एस एस शिरगण, डॉ. विजयकुमार बिरादार, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. माणिक शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. विनोद खरात यांनी केले तर आभार ग्रंथपाल विद्यानंद बाबर यांनी मानले.