24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्यासिक्कीममध्ये भूस्खलन, तिस्ता धरणावरीले वीज केंद्र उद्ध्वस्त

सिक्कीममध्ये भूस्खलन, तिस्ता धरणावरीले वीज केंद्र उद्ध्वस्त

बलुतार : वृत्तसंस्था
पूर्व सिक्कीममध्ये मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले. यामुळे राज्यातील एक वीज केंद्र जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गेल्या काही आठवड्यांपासून येथे सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ५१० मेगावॅट वीज केंद्राला लागून असलेली टेकडी धोक्यात आली होती.

मंगळवारी सकाळी टेकडीचा मोठा भाग घसरला आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज ५ धरणाचे पॉवर स्टेशन ढिगा-याखाली गेले. पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दिपू दराजवळील बलुतार येथे ही घटना घडली.

सतत भूस्खलन होत असल्याने वीज केंद्र काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. वीज केंद्राजवळ काम करणा-या लोकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये खडकाचा एक भाग घसरत असून काही वेळाने त्याचा मोठा भाग वीज केंद्राच्यावर पडत असल्याचे दिसत आहे.

सकाळी ७ च्या सुमारास भूस्खलन झाल्याची शक्यता आहे. भूस्खलनामुळे १७-१८ घरांचेही नुकसान झाले, ५-६ कुटुंबांना सुरक्षिततेसाठी एनएचपीसी क्वार्टरमध्ये नेण्यात आले होते. रहिवाशांच्या नुकसानीबरोबरच परिसरातील वीज प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये सिक्कीममध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे लोनाक ग्लेशियल लेक ओव्हरफ्लो झाला. ढगफुटीमुळे सिक्कीमचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, चुंगथांग येथील तीस्ता धरणाचा काही भाग वाहून गेला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR