25.9 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्रसिद्दिकी हत्या प्रकरणी २६ जणांवर आरोपपत्र?

सिद्दिकी हत्या प्रकरणी २६ जणांवर आरोपपत्र?

तीन आरोपींना फरार घोषित करणार!

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलिस आरोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणी एकूण २६ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

दरम्यान, शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशा तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. या हत्येमागील कारणाबाबत मुंबई गुन्हे शाखेला अद्याप काहीही ठोस सापडले नसल्याचा दावाही सूत्रांनी केला. मात्र मुंबई क्राईम ब्रँचने एसआरए वादात ही हत्या झाली आहे का, याचा तपास केला असता पोलिसांना एसआरए प्रकल्पामुळे ही हत्या झाली असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसल्याचेही बोलले जात आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील जवळीकता यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील अटक आरोपी दिलेल्या टास्कनुसार काम करत होते. त्यामुळे हत्येमागील मूळ कारणाबाबत त्यांनाही फारशी माहिती नसल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांना अटक होईपर्यंत या हत्येमागचे खरे कारण स्पष्ट होणार नसल्याचे मत तपास अधिका-यांचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR