अहमदपूर : प्रतिनिधी
सिध्दी शुगर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ च्या पुर्वतयारीच्या दृष्टीने रोलर पुजनाचा कार्यक्रम श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११. १० वा. कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव व संचालक सुरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सिध्दी शुगरचे मार्गदर्शक बाळासाहेब जाधव म्हणाले की, यावर्षी जिल्हयात व परिसरात समाधानकारक पाऊस सुरु असल्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, उर्ध्वमनार प्रकल्पासह आजूबाजूच्या साठवण व पाझर तलावामध्ये मुबलक पाणीसाठा होऊ लागला आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र निश्चीतच वाढणार असल्याने आपल्या कारखान्यासह सभोवतालच्या कारखान्यांना येणा-या हंगामासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता होणार आहे. परिसरातील आपल्या हक्काचा सिध्दी शुगर कारखाना असून सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी सिध्दी शुगर कारखान्याला ऊस पुरवठा करावा असे सांगून येणारा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, (जनरल मॅनेजर टेक्नीकल) बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन).पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डस्टिीलरी) एस.बी. शिंदे, चिफ फायनांस ऑफिसर डॉ. आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस.टी. सावंत, प्रशांत पाटील, आकुस्कर (बैंक स्थायी तपासणी अधिकारी.) डिस्टीलरी मॅनेजर सागर जाधव, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, इन्स्ट्रमेंट इंजिनिअर लोखंडे, डे.चिफ केमीस्ट शामराव लकडे, ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, उजना येथील दुधसंकलन केंद्राचे चेअरमन बापुसाहेब जाधव व प्रगतशिल शेतकरी संतोष कदम, प्रताप फाजगे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार बांधव उपस्थित होते.