वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोइंगच्या स्टारलायनर यानातील बिघाडामुळे अडकले आहेत. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बोईंग स्टारलाइनर अंतराळयान सुनीता आणि बुच यांना अंतराळात घेऊन गेले. नासाने माहिती दिली आहे की, ते अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत आणतील. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. दोन्ही अमेरिकन अंतराळवीरही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ‘नासा’च्या अंतराळवीर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करण्याचा विचार करीत आहेत. ‘अंतराळातून मतदान करणे हे अविस्मरणीय असेल,’ असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या.