मुंबई : बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपा-या फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. या वादानंतर लगेचच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार असा सज्जड इशारा दिला. होता त्याचाच प्रत्यय ठाण्यात काल (शनिवारी) आला.
दरम्यान, या सगळ्या राड्यानंतर आता मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काल जो राडा झाला तो आमच्या माणसांनी केलाय. त्याची सर्वस्वी आमची जबाबदारी आहे. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार. आम्ही आरे ला कारे करू. आम्ही संजय राऊत यांच्यासारखे पळपुटे नाहीत, दरम्यान, मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.
यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर गुन्हा देखील नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली.