पूर्णा : तालुक्यातील सुहागन येथे दि.१९ मे रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास मादी जातीचा अजगर पकडण्यात आला आहे. अजगराला पकडल्याने शेतक-याने सुटकेचा श्वास सोडला आहे. नागरीकांनी अजगर पाहण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
सुहान येथील सोसायटीचे चेअरमन बालाजी नामदेव भोसले यांच्या शेतात गट नंबर २६५ मध्ये अजगर ब-याच दिवसापासून वास्तव्यास होते. भोसले यांना शेतात विहिरीजवळ ब-याच वेळेस आढळल्यामुळे त्यांना भीती वाटत होती. त्यांनी दि.१९ मे रोजी सर्प अभ्यासक असलेले डॉ. विक्रम सारंग, सर्पमित्र नवनाथ सारंग यांना बोलावून घेतले. त्यांच्या विहिरीजवळ ११ फूट लांबीचे साडेआठ किलोचे अजगर आढळून आले. अजगर पकडल्यानंतर पाच अंडी सुद्धा सापडले व त्यानंतर गावाकडे आणून गावातील नागरिकांना दाखविण्यात आले. नागरिकांनी अजगराला पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. भोसले यांनी सुटकेचा श्वास सोडल्यानंतर वन विभाग नांदेडला नोंद करून अजगराला सोडून देण्यात आले.
वन्यजीव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड येथील सर्प अभ्यासक डॉ. विक्रम सारंग, सर्पमित्र नवनाथ सारंग यांचे परिसरातून कौतुक होत आहे. कोणाला अजगर कीवा साप दिसला डॉ.विक्रम सारंग यांना संपर्क करावा असे सांगितले आहे.