मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना आज मुंबई सत्रन्यायालयातील कोर्टात हजर केले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी चव्हाणांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सूरज चव्हाण यांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी आज सूरज चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आरोपी आहेत. आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.