28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरसेवा सोसायट्या कात टाकणार

सेवा सोसायट्या कात टाकणार

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांच्या जिवनात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सुबकता आणण्याचे काम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतक-यांना कर्ज वाटप, वसूलीसाठी रजीस्टर मध्ये होणा-या नोंदी आता ऑनलाईन संगणकात होणार आहेत. त्यासाठी जिल्हयातील ४८२ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवड होऊन जवळपास निम्या संस्थामध्ये संगणक बसवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. या संगणकाच्या माध्यमातून आता सेवा सहकारी सोसायटयांच्या व्यवहाराची नोंद होणार आहे.
लातूर जिल्हयात ५८५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. ग्रामीण भागातील शेतक-यांचा आर्थिक कणा म्हणून या सेवा संस्थाकडे पाहिले जाते. शेतक-यांना खरीप, रब्बी हंगामात पिक कर्ज वाटप करणे, वसूल करणे, कर्जाच्या व्याजाच्या नोंदी पुस्तकात ठेवल्या जात होत्या. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ऑडीट वर्ग अ, ब असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सेवा ऑनलाईन करण्यासाठी ५८५ पैकी ४८२ संस्थांची निवड करून त्यांना संगणकही देण्यात आले आहेत. ४८२ संस्था पैकी निम्या संस्थेत जवळपास संगणक बसवण्यात आले आहेत. या संगणकांच्या स्वॉप्टवेअर मध्ये सोसायटयांच्या पुस्तकांची, नोंद वहया ऑनलाईन केली जाणार आहेत. उर्वरीत १०३ सोसायटया मध्येही दुस-या टप्यात संगणक प्रणाली कार्यान्वीत केली जाणार आहे. सदर नोंदी या ऑफलाईन व ऑनलाईन होत राहणार आहेत.  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बळकट होण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जनऔषधी केंद्र, सीएससी केंद्रांचा आधार मिळणार आहे. तसेच नागरीकांनाही गावात व गावाच्या जवळ सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR