23.6 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeलातूरसोयाबीनचा सौदा ठप्प

सोयाबीनचा सौदा ठप्प

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात गुरूवारी मूग, उडीद, तुर या शेतमालाचा सौदा निघाला. मात्र हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने सोयाबीनचा सौदा निघाला नाही. सोयाबीनचा सौदा न निघाल्यामुळे भुसार मालाचा सौदा निघाला नाही.  लातूरच्या आडत बाजारात नविन सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रूपये हमी भाव जाहिर केला आहे. मात्र आडत बाजारात सोयाबीनची ४ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. सदर खरेदी ही हमी भावापेक्षा ५०० रूपयांनी कमी दराने होत आहे. ही बाब समोर आल्याने मनसे, छावा संघटनेने या प्रकरणी निवेदन दिले होते. त्यानुशंगाने डीडीआर यांनी लातूर जिल्हयातील सर्व बाजार समित्यांची नुकतीच बैठक बोलावून सोयाबीनची हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी करू नये, कडता, मात्रे, पायली ही अनिष्ठ प्रथा बंद करावी अशा सुचना बाजार समित्यांना दिल्या होत्या.
 नुसार लातूरच्या बाजार समितीने सर्व घटकांना पत्र काढले होते.  गुरूवारी मूग, उडीद, तूर या शेतमालाचा सौदा निघाल्यानंतर आडत्यांनी भूसार मालाचा सौदा काढण्याच्या आगोदर दोन दिवसापासून मोठया प्रमाणात आवक होत असलेल्या सोयाबीनचा सौदा काढण्याची मागणी केली. मात्र खरेदीदार व्यापा-यांनी नविन सोयाबीन हमी भावापेक्षा जास्त दराने खरेदीस नकार दिला. त्यामुळे सोयाबीनचा व भुसार मालाचा सौदा निघाला नाही. यामुळे शेतक-यांची मात्र आर्थिक कोंडी होताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR