27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसोयाबीन, कापूस उत्पादकांना अर्थसा  मिळणार!

सोयाबीन, कापूस उत्पादकांना अर्थसा  मिळणार!

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात खरीप हंगामातील मुख्य पिक म्हणून सोयाबीन या पिकाकडे पाहिले जाते. सोयाबीनला गेल्यावर्षी म्हणवा तसा उतारा आला नाही. तसेच सोयाबीनला भाव क्विंटल ५ हजार रूपयांच्या वर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक आडणीत होते. तसेच कापूस उत्पादक शेतक-यांचीही परिस्थिती अशीच राहिली. त्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरपर्यंत ५ हजार रूपये अर्थसाहय्य देण्याचा निर्णय घेतला असता त्यासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो अध्यादेश अजंून आला नसल्याने नविन परिपत्रकात काय येते, ते शेतक-यांना वाट पाहावी लागणार आहे.
सरकारने २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्याकिंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामाध्ये ५ लाख ९२ हजार ३६९ हेक्टरवर पेरा झाला होता. यात सर्वाधिक ५ लाख २ हजार ४७९ हेक्टरवर सोयाबीनचा, तूरीचा ६५ हजार ४६८ हेक्टर, मूग ४ हजार ४४३ हेक्टर, उडीद २ हजार ९५४ हेक्टर बरोबरच इतर पिकांचा पेरा झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR