16 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रसोलापूर पोलिसांची डायल ११२ यंत्रणा राज्यात अव्वल

सोलापूर पोलिसांची डायल ११२ यंत्रणा राज्यात अव्वल

सोलापूर : प्रतिनिधी
नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाची डायल-११२ ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यात राज्यात अव्वल ठरली. सोलापूर तसे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. तेथील पोलिसही तत्पर असून, नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी ही तत्परता दाखविण्यात येत आहे. त्यांची तत्परता राज्यात अव्वल ठरली आहे.

आपत्कालीन प्रतिसाद पथक (डायल-११२) सोलापूर शहर यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता, राजकीय सभा, कायदा व सुव्यवस्थेचा महत्त्वाचा बंदोबस्त, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्त्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करीत १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत एकूण १ हजार ७०७ नागरिकांकडून डायल ११२ या हेल्पलाइनवर पोलिस मदत मागितली, त्यांना पोलिस आयुक्तालाच्या डायल-११२ पथकाने कमीत कमी वेळेत सरासरी ३७ सेकंदांमध्ये प्रतिसाद देत मदत केली.

संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर शहर पोलिसांची यंत्रणा डायल-११२ ही यंत्रणा राज्यात नोव्हेंबर महिन्यात अव्वल ठरली आहे. नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. त्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच तांत्रिक सहाय्यकरिता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस मदतीसाठी डायल-११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलिस मदत मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहर पोलिसांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये सोलापूर शहर पोलिस आयुक्तालय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलिस प्रतिसाद मदत पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. नागरिकांना पोलिस मदत पोचविण्याचा सरासरी वेळ ३७ सेकंद असा आला आहे.

कमीत कमी वेळात मदत
पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत-कमी वेळात नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल, या दृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व बीट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले. पोलिस आयुक्तालयातील डायल-११२ घटकातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे पोलिस आयुक्त एम.राजकुमार,पोलिस उपायुक्त अजित बो-हाडे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR