22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरसोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केल्यास गुन्हे दाखल करणार

सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केल्यास गुन्हे दाखल करणार

पोलिस आयुक्त एम. राजकुमार

सोलापूर : सोशल मीडियावर कुणीही जातीय तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करू नका. असे केल्यास संबधितांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना दिला आहे. कोणताही व्हिडीओ शेअर करताना त्याची पडताळणी करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावरून काही ठिकाणी तणाव देखील निर्माण झालाय. हीच बाब लक्षात घेता पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

सोलापूर शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नये, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल कैले जातील. असा इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला आहे. शहरातील विविध समाजमाध्यमांवर सायबर क्राइमची करडी नजर ठेवण्यात आली आहे. याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील राजकुमार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात हाणामारीचे प्रकार घडले आहेत. संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा ही दाखल झाला आहे. मात्र, त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. वास्तविक पाहता फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखविण्याची शक्यता असते, असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती शेअर करणं हा मुद्दा शहरातील कायदा -सुव्यवस्था बिघडवण्याचे कारण ठरू शकते. जो समाजासाठी विघातक आहे. त्यामुळे तेढ निर्माण करणारी पोस्ट किंवा व्हिडीओ टाकण्यात येऊ नये. एखादी पोस्ट किंवा व्हिडीओ टाकत असताना,त्यातील सतत्या पडताळणे गरजेचे आहे. आलेली माहिती आहे तशी फॉरवर्ड करणे म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे, असंही पोलीस आयुक्त म्हणाले.
माथी भडकवण्याऱ्या पोस्ट शेअर केल्याने सोलापूर शहराचे नुकसानच होणार आहे. प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले आहे.

दरम्यान, शहरातील होम मैदान येथे फुंकर मारून चालकाला बेशुद्ध केलेल्या आणि त्याच्या हातातील आंगठी काढून घेतलेल्या साधू वेशातील अज्ञात इसमावर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याचा शोध सुरू असून,तपासासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याची आवाहन पोलीस आयुक्त यांनी केल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR