25.6 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeमहाराष्ट्र स्ट्राँग रूममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी 

 स्ट्राँग रूममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी 

- निलेश लंकेंकडून व्हीडीओ ट्विट

अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जवळपास दररोज काही ना काही समस्या समोर आणल्या जात आहेत. यामध्ये ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. यामध्ये आता शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांची भर पडली आहे. निलेश लंके यांनी ‘संरक्षणव्यवस्था थोडे उठा.. माणूस गोदामापर्यंत आलाय, असे म्हणत एक व्हीडीओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा.. माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहका-याने तो लगेच हाणून पाडला.

माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR