23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरहडोळती येथे घरात घुसून पती, पत्नीस काठीने मारहाण

हडोळती येथे घरात घुसून पती, पत्नीस काठीने मारहाण

हडोळती : प्रतिनिधी
तालुक्यातील हाडोळती येथील शेतीच्या वादाची जुनी कुरापत काढून जवळपास नऊ लोकांनी मिळून संगणमत करून नरंिसंग पवार यांच्या घरासमोर शिवीगाळ करून, डोक्यात लोखंडी रॉडने, काठीने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नऊ जणांवर अहमदपूर पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी फरार आहेत.
येथील नरंिसग देविदास पवार यास घरात जेवण करीत असताना घरासमोर येऊन शिवीगाळ करून व दरवाजावर लाथा मारुन पत्नीला  पोटात-पाठीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा पवन पवार हा सोडविण्यास आला असता यालाही मारहाण करण्यात आली आहे. नरंिसग पवार यास यावेळी डोक्यात, उजव्या पायावर मारून पाय फ्रॅक्चर केल्याचे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे. यांची भावजय व इतर एक जण भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. जखमींवर हाडोळती येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठविण्यात आले असता तेथून अश्विनी हॉस्पिटल लातूर येथून बरे होऊन आल्यानंतर तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.
दि ३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नरंिसग पवार, पत्नी व मुलगा यास काठीने, दगडाने, लाथा, बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून आरोपी माधव पवार ,अमर पवार ,सुनील पवार, अनुसया पवार ,भगतंिसंग पवार ,अभिनव पवार ,अनिकेत पवार, पवन पवार ,भुजंग कबीर अशा एकूण नऊ लोकांवर दि १३ एप्रिल रोजी अहमदपूर पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली  आहे.  या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता ३२६ ,४५२,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ अशा दहा कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.  अधिक तपास आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेश अलीवार हे करीत आहेत. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे समजते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR