29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूर‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सिद्धेश्वर देवालय दुमदुमले 

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सिद्धेश्वर देवालय दुमदुमले 

लातूर : प्रतिनिधी
भक्त्तिमय वातावरणात लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचा दि. ८ मार्च रोजी शुभारंभ झाला. लातूरसह परिसरातील नागरिकांनी मध्यरात्रीपासून रांगा लावून दर्शन घेतले. ‘हरहर महादेव’च्या जयघोषाने सिद्धेश्वर देवालयाचा परिसर दुमदुमला. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणा-या यात्रा महोत्सवास मध्यरात्री गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने प्रारंभ झाला. रात्री १२ वाजता गवळी समाजातील युवकांनी श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक केल्यानंतर दर्शन सुरु झाले.
महाशिवरात्री निमित्त सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहिणी न-हे, तहसीलदार सौदागर तांदळे, देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम  गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे, आप्पासाहेब घुगरे, विशाल झांबरे, व्यंकटेश हांिलगे, ओम गोपे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
   यंदा जागतिक महिला दिनी महाशिवरात्री यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रा उत्सवाच्या  इतिहासात पहिल्यांदाच महिला जिल्हाधिका-यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते महिला तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटनही यावेळी  झाले. मध्यरात्रीपासूनच श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी भक्त्तांनी रांगा लावल्या होत्या. हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी, महिला व वृद्धांनी रांगा लावून दर्शन घेतले. यात्रा महोत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्त्तांच्या सोयीसाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही मंदिर परिसरास भेट देऊन श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनास विविध सूचनाही केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR