20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रहातोड्याचे घाव घालून महिलेचा खून!

हातोड्याचे घाव घालून महिलेचा खून!

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या महिलेचा तिच्या प्रियकराने खून केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने महिलेचा मृतदेह हा खंबाटकी घाटात फेकून दिला.

ही महिला त्याला सतत पैशांची मागणी करत असल्याने आणि चारित्र्याच्या संशयावरून त्याने या महिलेचा खून केला. यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलाला आळंदी येथे बेवारस अवस्थेत सोडून दिले. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जयश्री विनय मोरे (वय २७,) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व जयश्री हे गेल्या ५ वर्षांपासून वाकड येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांना ३ वर्षांचा मुलगा देखील आहे. दिनेशचे लग्न झालेले आहे. असे असताना तो जयश्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. तर जयश्रीचा देखील ७ वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. जयश्री ही तिच्या पतीसोबत राहत नव्हती. दरम्यान, जयश्री व दिनेशमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. जयश्री ही दिनेशला वारंवार पैसे मागत होती. यावरून तो तिला जाब विचारत असे. तसेच जयश्री ही स्वतंत्र राहण्याची मागणी देखील करत होती. त्यामुळे दिनेश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
गेल्या रविवारी (दि. २४) दोघेही बाहेर गेले होते. यावेळी ते परत आले असता, भूमकर चौकात कारमध्ये त्यांचे भांडण झाले. या भांडणादरम्यान राग आल्याने दिनेशने जयश्रीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. हा घाव वर्मी बसल्याने जयश्रीचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट साता-यातील खंबाटकी घाट गाठला. त्याने जयश्रीचा मृतदेह तेथे फेकून दिला. यानंतर पुन्हा पुण्यात येत त्याने वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २५) जयश्री ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

आरोपी दिनेशने आधी हिंजवडी पोलिसांकडे जाऊन पत्नी मिसिंग असल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने योग्य उत्तरे दिली नाहीत. यानंतर त्याने त्याच्या व जयश्रीच्या ३ वर्षांच्या मुलाला थेट आळंदी येथे बेवारस सोडून दिले. यानंतर त्याने वाकड पोलिस ठाण्यात जाऊन जयश्री हरवली असल्याची तक्रार दिली. आरोपीचा मुलगा हा आळंदी पोलिसांना मिळाला. त्याचे आई-वडील शोधण्यासाठी त्यांनी मुलाचा फोटो व्हायरल केला. याच वेळी खंबाटकी घाटात जयश्रीचा मृतदेह सापडला. दरम्यान मुलाचा देखील शोध पोलिसांना लागला. वाकड पोलिसांनी आळंदीहून दिनेशला बोलावून घेतले. यानंतर त्याची चौकशी केल्यावर त्यानेक जयश्रीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR