नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर यांना अटक करण्यात आली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. हाथरसमधील दुर्दैवी अपघातासाठी तो कारणीभूत ठरल्याचे पोलिसानी सांगितले. या अपघातात १२१ जणांचा बळी गेला. यात अधिकाधिक महिला होत्या.
नारायण साकार हरी ऊर्फ भोलेबाबा यांचा हाथरसमध्ये सत्संग झाला. सत्संगसाठी प्रशासनाकडून ८० हजार लोकांची परवानगी घेण्यात आली होती. पण प्रत्यक्षात २.५ लाखांपेक्षा अधिक लोक येथे आले होते. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलाला बळाचा वापर करावा लागला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात मोठ्या प्रमाणात भाविक चिरडले गेले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे बळींची संख्या तब्बल १२१ वर पोहोचली. हाथरसमधील घटनेने संपूर्ण देश हादरला. बाबांचा सत्संग झआल्यानंतर तो गाडीत बसून निघाला. त्यावेळी त्याच्या पायाची धूळ डोक्याला लावण्यासाठी लोकांनी गाडीमागे धाव घेतल्याचे सांगितले जाते. यावेळी उपस्थित रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे समजते. या प्रकरणी मुख्य आयोजक फरार होता. त्याला आज अटक करण्यात आली.