22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeक्रीडाहार्दिक-नताशाने केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा

हार्दिक-नताशाने केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची घोषणा केली आहे. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाची टी-२० वर्ल्ड कपपूर्वीपासून चर्चा सुरू होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी २०२० साली लग्न केले होते. त्याचवर्षी त्यांना अगस्त्य हा मुलगा झाला. अगस्त्यचे संगोपन आम्ही दोघंही करू. तो आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. त्याला आनंदी ठेवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करू, असे या दोघांनीही जाहीर केले आहे.

हार्दिक पांड्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, मी आणि नताशाने ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर परस्पर सहमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. या नात्याला आपले सर्वस्व दिले. हा आमच्यासाठी एक कठीण निर्णय होता.

आम्हाला एकमेकांपासून मिळालेला आनंद, सन्मान आणि सहकार्य याचा विचार करून हा निर्णय घेणे दोघांच्याही हिताचे होते. आम्हाला अगस्त्यचा आशीर्वाद मिळाला आहे. तो आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य आहे ते सर्व करू. या अवघड आणि नाजूक परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर राखाल याची आम्हाला आशा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR