16.9 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रहा आमचा अंतर्गत प्रश्न ; थोडा वेळ तर द्या

हा आमचा अंतर्गत प्रश्न ; थोडा वेळ तर द्या

भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कोल्हापूर: मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचं म्हणत, तीव्र प्रतिक्रिया दिल्या. याच संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार हे कोल्हापूर दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोल्हापूरमधील विकासकामांबाबत चर्चा केली तसंच, अनेक विषयांवरही भाष्य केलं

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR