चंदिगड : वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागामध्ये चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने केलेल्या दाव्यानुसार भारताच्या सीमेमध्ये चीनकडून ड्रोन पाठवण्यात आले होते. एवढंच नाही तर चिनी विमानेही या भागात दिसली होती, असाही दावा करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री जगत स्ािंह नेगी यांनी या दाव्यांना दुजोरा दिला आहे. चीनकडून सीमाक्षेत्रामध्ये होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे चीनच्या हेतूंबाबत शंका उपस्थित झाली असून, ही माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
लष्कर, पोलीस आणि सर्वसामान्यांनीही भारताच्या सीमेमध्ये हे ड्रोन पाहिले. नंतर हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री जगत स्ािंह नेगी यांनीही या घटनेला दुजोरा दिला. या प्रकारानंतर सीमेजवळ राहणा-या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
किन्नौर जिल्ह्यातील भारताच्या सीमेमध्ये या चिनी ड्रोननी घुसखोरी करून भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले. शिपकी ला बॉर्डक आणि पूह ब्लॉत हेडक्वार्टरसमोर ऋषी डोगरी येथेही ड्रोन दिसून आले. ड्रोन पाठवून चीन सीमावर्ती भागामध्ये भारताकडून होत असलेली रस्तेबांधणी आणि इतर हालचालींची माहिती घेत असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.