मुंबई :
फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हिरानंदानी ग्रुपच्या चार जागांवर छापे मारले. हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा नियम) उल्लंघन प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेला काही नवीन माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने २२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांची ही कंपनी असून ती संकटात सापडली आहे. हिरानंदानी ग्रुपची स्थापना १९७८ साली झाली होती. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद येथे हिरानंदानी ग्रुपचे प्रकल्प आहेत.