27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रहीच माझ्या कामाची पोचपावती

हीच माझ्या कामाची पोचपावती

कोल्हेंचा महायुतीला टोला शिरूर लोकसभा मतदानसंघावरून पेच

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धक होते. आता आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल, अशी त्यांची भूमिका आहे. यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.

आपण महायुतीची ताकद बघत असाल तर, जवळपास दोनशे आमदार, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे. एवढी मोठी ताकद असताना आपण ज्या दोनही उमेदवारांची नावे घेतली आणि शक्यता व्यक्त केल्या, त्यात शिवाजीराव आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर? किंवा प्रदीप दादा कंद हे भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार. याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून, म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागणार आहे. गेली पाच वर्षे माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कामाची ही पोचपोवती आहे असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अजित पवार शिरूर मतदारसंघासाटी ठाम
शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नुकतीच महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी जागावाटपात ही जागा आपल्याकडेच हवी, यासंदर्भात ठामपणे भूमिका मांडली. मुख्यमंर्त्यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेला सहमती दर्शवल्याचं बोललं जात आहे. यामुळे शिवाजीराव आढळराव पाटी यांना महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार आहे.

तर कोल्हे विरोधात लढू : पाटील
अन्यथा भाजपच्या प्रदीप कंद यांना अजित पवारच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तत्पूर्वी, मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढवायची का, यासंदर्भात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी निर्णय घेतला आणि आदेश दिला तर आपण अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढेन असे आढळराव पाटील यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR