21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर‘हेलमेट’ चे पोलिसांनाच वावडे

‘हेलमेट’ चे पोलिसांनाच वावडे

लातूर : विनोद उगिले
सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ब-याच वर्षापुर्वी राज्य शासनाने हेलमेटची सक्त्ती केली असून चालकांसह मागे बसणा-यानेही हेल्मेट घालणे हा आदेश जुनाच आहे तसे सदरील आदेशात नमुद  आहे. असे असताना मात्र कलम १२८ आणि १२९ ऑफ एमव्ही अ‍ॅक्ट १९९८ कायद्यातील तरतुदी प्रमाणे अमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत असल्याचा ठपका ठेवत ई चालन मशिनच्या कलम १२८ आणि १२९ ऑफ एमव्ही अ‍ॅक्ट १९९८ मधील शिर्षकामध्ये बदल करत नव्याने संबधितांना आदेश काढत या आदेशाची अमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. जुन्या आदेशाची व नव्याने काढण्यात आलेल्या आदेशाची अजून ही जिल्ह्यात प्रभावी पणे अजून तरी अमल बजावणी होताना दिसून येत नाही यावरून  हेलमेट वापरासंबधी आदेश अमलबजावणीचे पोलीस प्रशासनालाच वावडे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
लातूर जिल्ह्यातील बहुतांश मोटारसायकलस्वारांनी व वाहतूक व पोलीस प्रशासनाने हेलमेंट वापरासंबधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आज पर्यंत तरी गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. या आदेशाची केवळ कागदोपत्री किरकोळ कारवाईतून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती कागदावरच राहिल्याचे दिसून येते. रस्ते अपघातात दररोज अनेक दुचाकीस्वार बळी जात असताना हेलमेट  वापराबाबत उदासीनता असणे गंभीर बाब आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी का होईना हेलमेटचा वापर करणे आवश्यक आहे. परिवहन विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मोटारसायकलीवर मागे बसणा-यानेही हेल्मेट घालणे सक्तीचे ब-याच वर्षापुर्वी केले आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील बहुतांश मोटारसायकलस्वार व त्यांच्या मागे बसणारे हेलमेट घालायला तयार  नाहीत. एखादा अपवाद वगळता बहुतांश दुचाकीस्वार बिगर हेलमेट दुचाकी चालवताना दिसून येत आहेत. शासनाच्या या सक्तीनंतर पोलिस प्रशासनाने ही पोलिस कर्मचा-यांना हेलमेट सक्ती करत व कारवाईचा बडगा उगारत हेलमेट सक्तीतून कुणालाही सुट नसल्याचे तसेच पेट्राल सुद्धा मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याची ही चर्चा होती.
मात्र आता बहुतांश दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी विना हेलमेट दुचाकी दामटताना आढळून येत आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी हजारो  दुचाकीस्वारांचा बळी जात आहे. त्यामुळे  शासनाला त्यासाठी  सक्ती करावी  लागत आहे. असे असतानाच दि. २५ नोव्हेंबर रोजी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक (मुख्यालय)अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक) मुंबई यानी कलम १२८ आणि १२९ ऑफ एमव्ही अ‍ॅक्ट १९९८ कायद्यातील तरतुदी व ई चालन मशिनच्या कलम १२८ आणि १२९ च्या शिर्षकामध्ये बदल करत याची अमल बजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, व सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना काढल्याने पुन्हा हेलमेट सक्ती व कारवाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR