27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रहे सरकार निर्लज्ज : पटोले

हे सरकार निर्लज्ज : पटोले

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. राज्यात विभागनिहाय आढावा बैठका झाल्या. आता त्या त्या मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यांच्या ‘लाडक्या खुर्ची’ ला कोणी घाबरायची गरज नाही. हे सरकार निर्लज्ज आहे. त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेसची बैठक असून या सभेत काँग्रेसनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कार्यक्रमात बोलवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे तिकिट मागणा-यांची लाईन लागली आहे. हजारो अर्ज आले आहेत, असेही पटोले म्हणाले.

बटण दाबले नाही तर योजना बंद : अजित पवार
बटण दाबले नाही तर योजना बंद होईल असे अजित पवार म्हणाले असून कालही एकजण असे बोलल्याचा नाना पटोले यांनी दावा केला. यांच्या लाडक्या खुर्चीला कोणी घाबरायची गरज नाही. कोर्टाने आज त्यांना चांगलेच झापले आहे. भूसंपादन, कर्जमाफी प्रोत्साहनाचे पैसे अजून दिले नाहीत. याला एकनाथ शिंदे सरकार जबाबदार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

महायुतीचे यंदा १०० च्या आत उमेदवार
काँग्रेसकडे तिकिट मागणा-यांची लाईन लागली आहे. हजारो अर्ज आले आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलीही चर्चा नाही. महाविकास आघाडी म्हणून आमचा चेहरा असेल, तोच घेऊन आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राज्यात महायुतीचे १०० च्या आत उमेदवार निवडून आलेले असतील असा दावा त्यांनी केला.

ते आमची कॉपी करतात
महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य म्हणून देशात प्रसिद्ध झाले आहे. राज्यात शेतक-यांच्या सगळ्यांत जास्त आत्महत्या झाल्या आहेत. जिथे आमचे सरकार आहे तिथे या योजना आहेत.आमची कॉपी ते करत आहेत त्यामुळे घाबरायची काही गरज नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR