25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Home१० वर्षांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद कॉँग्रेसला!

१० वर्षांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद कॉँग्रेसला!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१८ व्या लोकसभा विरोधी पक्षाची एकजूट देखील कायम असल्याने १० वर्षांनंतर सभागृहातील विरोधी पक्ष नेते पद कॉँग्रेसला मिळणार आहे. विरोधी पक्षांना आशा आहे की, लवकरच लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. हे पद देखील गेल्या पाच वर्षांपासून रिकामे आहे.

१७ व्या लोकसभेतील संपूर्ण कालावधीत उपाध्यक्ष पद मिळाले नव्हते. या शिवाय कनिष्ठ सभागृहाला लागोपाठ दुस-या टर्ममध्ये विरोधी पक्ष नेते पदापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा खालच्या सभागृहात विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे लागल्या आहे. विरोधी पक्षाला एक विरोधी पक्ष नेते पद आणि एक डेप्युटी स्पीकर ही दोन पदे लवकरच मिळतील अशी आशा लागून राहीली आहे.

कॉँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक नुकतीच झालीे. या बैठकीत सभागृहातील विरोधी पक्ष नेते पद राहूल गांधी यांनी स्विकारावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतू याप्रस्तावावर आपण विचारांती निर्णय घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांना संसदीय दलाचे अध्यक्ष म्हणून सार्वनुमते निवडण्यात आले.
उपाध्यक्ष निवडण्यात येणार : सर्वसाधारणपणे लोकसभेचे उपाध्यक्ष (डेप्युटी स्पीकर) पद हे विरोधी पक्षाला दिले जात असते. परंतू कॉँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने आतापर्यंत या संदर्भातील कोणतीही समन्वय बैठक आतापर्यंत घेतलेली नाही. आम्ही यावेळी हे पद रिकामे राहू नये यासाठी सरकारवर दबाव आणू असे एका विरोधी पक्ष नेत्याने सांगितले आहे.

लोकसभेत गेली दहा वर्षे विरोधी पक्ष नेते पद रिकामे आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत कॉँग्रेसला ४४ जागा आणि २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्या होत्या. भाजपनंतर सर्वात जादा जागा आता कॉँग्रेसला मिळाल्या होत्या तरी देखील कॉँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले नव्हते.

विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी कोणत्याही पक्षाजवळ लोकसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के जागा निवडून येण्याची गरज असते. म्हणजे लोकसभेच्या ५४३ जागा सध्या आहेत. तर ५४ खासदार निवडून येण्याची आवश्यकता आहे.

१७ व्या लोकसभेत कॉँँग्रेसचे ५२ खासदार निवडून आल्याने दोन जागा कमी पडल्याने कॉँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते पदाची खूर्ची गेली होती. यंदा कॉँग्रेसने चांगली कामगिरी करीत आपल्या ताकदीवर ९९ खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे यंदा कॉँँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची मानाची खूर्ची मिळण्याची संधी आहे.

विरोधी पक्ष नेते पदासाठी राहुल गांधी
विरोधी पक्ष नेते पद लोकशाहीत खूपच महत्वाचे असते. या पदाला लोकसभेत खूप मान असतो. या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असतो. सरकारच्या योजनांवर बोलणे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम चांगला विरोधी पक्ष नेता करीत असतो. या पदासाठी लाल दिव्याची गाडी देखील असते. विरोधी पक्ष नेता सीबीआय-ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे संचालक निवडप्रक्रीयेत सहभागी असतात.पंतप्रधानांबरोबर या निवड समितीत विरोधी पक्ष नेते पदाचा सल्ला घेतला जातो. यंदा या पदासाठी कॉँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी यांचे नाव सुचविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR