21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूर१४४ प्रकल्पांत ७३.६० टक्के पाणीसाठा 

१४४ प्रकल्पांत ७३.६० टक्के पाणीसाठा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील २ मोठ्या प्रकल्पांत ७५.४० टक्के, ८ मध्यम प्रकल्पांत ६७.६३ टक्के तर १३४ लघू प्रकल्पांत ७४.३९ टक्के, असे  एकुण १४४ प्रकल्पांत ७३.६० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून अजूनही परतीचा पाऊस पडायचा असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
लातूर, बीड व धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात एकुण पाणीसाठा २२४.०९३ दशलक्ष घनमीटर आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा १७६.९६३ दशलक्ष घनमीटर, पाणी पातळी ६४१.३३ मीटर आहे. एकुण पाणीसाठा १८१.८२२० दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीासाठा १३४.६९२ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ७६.११ एवढी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात एकुण पाणीसाठा १२१.१८८ दशलक्ष घनमीटर, मृत पाणीसाठा २९.,९६७ दशलक्ष घनमीटर, पाणीपातळी ६०३.५० मीटर, एकुण पाणीसाठा ९७.४८३० दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ६७.५१६ दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठयाची टक्केवारी ७४.०१ इतकी आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांत एकुण ७५.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ३.४८६ दलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी १७.१३ एवढी आहे. रेणापूर तालुक्यातील रेणापुर मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १९.५९० दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९५.३१ इतकी आहे. याच तालुक्याल व्हटी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहे. उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १४.३०० दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठयाची टक्केवारी ९३.५३ इतकी आहे. याच तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पात ४.१४९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ३८.८५ एवढी आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४.९४० दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४५.१२ इतकी आहे. याच तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पात २१.३६६ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९५.११ एवढी आहे. निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ६.५०७ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४७.३५ इतकी आहे. ८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा ८२.६०८ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६७.६३ एवढी आहे. जिल्ह्यातील १३४ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा २३३.८१४ दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६७.६३ एवढी आहे.
अद्यापही चार लघु प्रकल्प कोरडे 
जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. १६ प्रकल्पांत ७५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, २१ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ४१ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली, २० प्रकल्प जोत्याखाली तर ४ प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR