29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूर१६ लाख ३३ हजारांचा गुटखा पकडला

१६ लाख ३३ हजारांचा गुटखा पकडला

लातूर : प्रतिनिधी
येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यांची माहिती काढत असताना दि. १३ डिसेंबर रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे उदगीर तालुक्यात सापळा लावला. अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणा-या वाहनाचा २० किलो मीटर पाठलाग करुन १६ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू  जप्त करुन बीड जिल्ह्यातील एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगीतले, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करुन लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. या पथकाला दि. १३ डिसेंबर रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की, एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते अंबाजोगाई व्हाया उदगीर वाहतूक होणार आहे. सदर माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी उदगीर तालुक्यामध्ये सापळा लावून तसेच सदर गाडीचा जवळपास २० किलोमीटर पाठलाग करून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन  नळेगावजवळ उदगीर ते घरणी मोड परिसरामध्ये ताब्यात घेतले.
सदर वाहनाची झडती घेतली असता त्याचा क्रमांक एम.एच. २४ ए.डब्ल्यू. ९८९९ असा असल्याचे दिसले. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा वाहनासह १६ लाख ३३ हजार ७०० रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू कारसह जप्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या  अंबाजोगाईकडे घेऊन जात असताना गुटख्याची वाहतूक करीत असताना मिळून आलेला आलेले सुरज दत्तात्रय खंडापुरे, वय ३२ वर्ष, राहणार साळुंकवाडी
तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चाकुरचे पोलीस अधिकारी, अंमलदार करीत  आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, पोलीस चालक अमलदार प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR