27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र१७ ऑगस्टला डॉक्टरांचा संप; दवाखाने राहणार बंद

१७ ऑगस्टला डॉक्टरांचा संप; दवाखाने राहणार बंद

मुंबई : प्रतिनिधी
कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणा-या एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. पश्चिम बंगाल पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरीही डॉक्टर तसेच आरोग्य सेवा संबंधित इतर कर्मचारी या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत.
डॉक्टरांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देशभरातून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत अनेक मागण्या केल्या जात आहेत.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी, १७ ऑगस्टला देशव्यापी संप पुकारला आहे. कोलकाता आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आयएमएने संप पुकारला आहे. १७ ऑगस्ट रोजी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दवाखाने, डॉक्टरांचे क्लिनिक, ओपीडीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. पण, यावेळी रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.

या संपामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएने एक पत्रक जारी करत या संपाबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये नमूद केले आहे की, या संपादरम्यान सर्व दवाखाने, डॉक्टरांचे क्लिनिक, ओपीडीच्या सेवा या १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत असा तब्बल २४ तास बंद पुकारण्यात आला आहे. पण, यावेळी रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा या संपादरम्यान सुरू असणार असल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमए एकत्रितपणे या संपामध्ये उतरणार असून यामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, यावेळी, आरोग्य कर्मचा-यांसाठी सुरक्षा कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जवळपास २५ राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, मात्र , त्याची अंमलबजावणी होत नाही. तसेच, रुग्णालयांमध्ये ५० टक्के महिला डॉक्टर असतील तर त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे देशातील सर्व रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करावीत आणि केंद्रीय संरक्षण कायदा त्वरित लागू करावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR