23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीय१८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर ब्लॉक

१८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर ब्लॉक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फेक कॉल आणि मॅसेजला आळा घालण्यासाठी ट्रायने १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. आता युजर्सना येणारे फेक कॉल्स आणि मॅसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील. ट्रायने घोटाळेबाजांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. गेल्या ४५ दिवसांत १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स आणि ६८० अ‍ॅन्टिटीज ब्लाक केल्या आहेत. त्यामुळे मोबाईलधारकांना मोठा झटका बसला आहे.

ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली. ट्रायने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्पॅमर्सवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या ४५ दिवसांत ६८० अ‍ॅन्टिटीज ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. तसेच १८ लाख मोबाईल नंबर्सची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल युजर्सना धक्का बसला आहे. ट्रायने फेक कॉल आणि मॅसेजला पूर्णत: आळा घालण्याच्या दृष्टीने नवीन नियम लागू केला आहे. यातूनही कुणी तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. अर्थात, मोबाईल नंबरच ब्लॉक केले जाणार आहेत.

या आधीही ट्रायने घोटाळ््यात सहभागी झाल्यामुळे लाखो मोबाईल नंबर्स ब्लॉक केले होते. आतापर्यंत ट्रायने १ कोटीहून अधिक मोबाईल नंबर्सवर कारवाई करून त्यांची सेवा बंद केली आहे. गेल्या महिन्यातही ट्रायने कठोर भूमिका घेत ३.५ लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक केले होते. दूरसंचार विभाग आणि ट्राय युजर्सना स्पॅम फ्री सर्व्हिस क्वालिटी देण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्सना बल्क कनेक्शन, रोबोटिक कॉल्स आणि प्री-रेकॉर्डेड कॉल्स ब्लॉक करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरमध्येही ट्रायने ३.५ लाख अनव्हेरिफाईड एसएमएस हेडर आणि १२ लाख कॉन्टेंट टेम्पलेट ब्लॉक केले होते.

त्यातच आता १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नियमांत ट्रायने नेटवर्क ऑपरेटरना टेक्नॉलॉजीचा वापर करून यूआरएल, एपीके लिंक, ओटीटी लिंक असलेले मॅसेज ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. युजर्सला कोणतेही यूआरएल असलेले कोणतेही मॅसेज प्राप्त होणार नाहीत. युजर्सना केवळ व्हाईटलिस्टमध्ये असलेल्या संस्था आणि टेलिमार्केटकडून लिंक असलेले मॅसेज प्राप्त होतील. तसेच ट्रायने सूचविलेल्या मॅसेज टेम्प्लेटवर आधारित यूआरएल किंवा ओटीपीसारखी इतर संवेदनशील माहिती असलेले मॅसेज व्हाईटलिस्ट करण्यात टेलिमार्केटर सक्षम असतील. युजर्सना व्हाईटलिस्टमध्ये नसलेल्या संस्था किंवा टेलिमार्केटरकडून मार्केटिंग करणारे कॉल येणार नाहीत.

…तर सिम ब्लॉक होण्याचा धोका
ट्रायचा हा नियम सर्व मोबाईल नंबरवर लागू होतो, ज्याद्वारे मार्केटिंग कॉल केले जातात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक नंबरवरून मार्केटिंग किंवा कोणत्याही प्रकारचे प्रमोशनल करीत असल्यास ट्राय तुमचे सिम ब्लॉक करू शकते. मार्केटिंग कॉल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कनेक्शन घ्यावे लागेल, ज्यासाठी ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

फेक कॉल्सला बसणार आळा
ट्रायने आता फेक कॉल्स आणि मॅसेजला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच कारणावरून आतापर्यंत लाखो मोबाईल ब्लॉक झाले आहेत. ट्रायचे हे कठोर पाऊल पाहता मोबाईलधारकांना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मुळातच मोबाईल ऑपरेटर्सच हे फेक कॉल्स, मॅसेज रोखत आहे. त्यातूनही अशा चुका झाल्या तर संबंधितांचा नंबर ब्लॉक होऊ शकतो. हा कारवाईचा धडाका पाहता आगामी काळात फेक कॉल्सना आळा बसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR