28.5 C
Latur
Sunday, September 22, 2024
Home१ व्यक्ती १२ तासात घेते सरासरी ३५ हजार निर्णय!

१ व्यक्ती १२ तासात घेते सरासरी ३५ हजार निर्णय!

मेंदूची टिकटिक। ‘हार्वर्ड बिझनेस’नुसार, बरेच निर्णय त्वरीत आणि काही एकाच वेळी आपोआप घेतले जातात

मुंबई : वृत्तसंस्था
माणसाच्या मेंदूत घड्याळाच्या काट्याप्रमाणे टक टक सुरूच राहते. सकाळी सुरू झालेले हे चक्र रात्री बिछान्यावर पडेपर्यंत सुरूच असते आणि या चक्रात तुम्ही किती निर्णय घेता हे कळल्यावर कुणालाही धक्का बसेल, अशी आकडेवारी समोर आली आहे. चहा घ्यायचा की कॉफी? नाश्ता करायचा का? केलाच तर काय खायचं? इथपासून ते रात्री झोपण्यापूर्वी उद्या कितीचा अलार्म लावायचा? इथपर्यंत एक व्यक्ती साधारण दिवसाला सरासरी ३३ ते ३५,००० निर्णय घेते.

सकाळपासून ते दिवस संपेपर्यंत एक व्यक्ती किमान ३३ ते ३५ हजार निर्णय घेते, असे ‘हॉर्वर्ड बिझनेस’च्या अहवालात म्हटले आहे. हार्वर्ड बिझनेस अहवालानुसार, यापैकी बरेच निर्णय त्वरीत आलेले असतात आणि एकाच वेळी काही निर्णय आपोआप घेतले जातात.

अनेकदा काही निर्णय अधिक कठीण असतात आणि ते घेण्यापूर्वी जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता असते. असे निर्णय जे आपल्या पुढील आयुष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. यासाठी ते घेण्यापूर्वी पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. असे निर्णय घेण्यासाठी भूतकाळातील अनुभव, सद्य परिस्थिती, निर्णयानंतरचे परिणाम आदी घटक खूप महत्त्वाचे ठरतात. या सर्व गोष्टींचा निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात.

आज जिमला जाऊ की नको? की जायला हवं? ऑफिसला जावं की नाही? मग टिफिनमध्ये काय घेऊ की बाहेरच खावं? अशा बारीकसारीक गोष्टी आपल्या या निर्णयाचा भाग असतात, पण त्या आपल्याला जाणवत नाहीत. तुमचा मेंदू त्यामुळेच दिवसअखेरीस थकलेला जाणवतो. अशा वेळी तुम्हाला जलद आणि त्वरित निर्णय घेण्यात अडचण येते. ओव्हरलोडमुळे थकवा जाणवतो आणि मरगळल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत स्वत:ला थोडा वेळ देणे आणि निवांत राहणे आवश्यक आहे.

युनायटेड किंग्डमच्या लिसेस्टर युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका इव्हा क्रोकोव यांच्या मते सकाळी ब्रेकफास्ट बनवण्यापासून किंवा कोणते कपडे घालावे, असे जवळपास ३५ हजार निर्णय एक व्यक्ती दिवसाला घेते. इतके निर्णय घेऊन थकवा जाणवतो, असे अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या असोसिएशनचे सराव संशोधन आणि धोरणासाठी सहयोगी कार्यकारी संचालक लिन बुफ्का यांनी सांगितले. समोर उपलब्ध पर्यायांपैकी सगळ्यांचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने विचार केला गेला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेता आले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR