27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय२०२९ मध्ये ‘एनडीए’चे सरकार : मोदींची ग्वाही

२०२९ मध्ये ‘एनडीए’चे सरकार : मोदींची ग्वाही

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२९ मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इशा-या-इशा-यात’ म्हटले आहे की, आपण २०२९ मध्ये सलग चौथ्यांदा सत्तेत येणार आहोत. पाच वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा ‘एनडीए’चेच सरकार स्थापन होईल. ते मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, हा पाचवा फिनटेक फेस्ट आहे आणि पाच वर्षांनंतर होणा-या दहाव्या फिनटेक फेस्टसाठीही आपण येणार.

अर्थात पंतप्रधान मोदी यांनी संकेत दिले आहे की, पाच वर्षांनंतरही केंद्रात त्यांचेच सरकार असेल आणि ते पंतप्रधान म्हणून फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील. एवढेच नाही, तर आमचे बेस्ट समोर येणे अद्याप बाकी आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पंप्रधान मोदींचा यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

गेल्या १० वर्षांत, फिनटेक क्षेत्रात २१ अब्ज डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतात ब्रॉडबँड वापरकर्ते ६ कोटींवरून ९४ कोटी झाले आहेत. आज, १८ वर्षांच्या वरचा क्वचितच कुणी भारतीय असेल, ज्याची डिजिटल ओळख म्हणजेच आधार कार्ड नसेल. एवढेच नाही तर, गेल्या १० वर्षात ५३ कोटींहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR