बीड : शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात पेपर लिहिता लिहिता एका २४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. परीक्षा देत असताना २४ वर्षीय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. अनन्याच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ असे मृत परीक्षार्थी विद्यार्थ्याचे नाव आहे.. परीक्षा सुरू असताना अचानक हा विद्यार्थी कोसळला. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वी मालवली होती.