23.7 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूर२५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार

२५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार

लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्­त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २५ जून ते २४ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्­तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहेत.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच २५ जुलै ते ९ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत १९ ऑगस्टपर्यंत राहणार असून २० ऑगस्ट  रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे. १ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नाव नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्­याच पार पडलेल्­या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्­हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास, अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे. भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रत्­येक मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्­यात येणार आहे.
छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्­यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्यामुळे नागरिकांकडे मतदार ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्­याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. तरी नागरीकांना आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App या मोबईल अ‍ॅप चा वापर करावा. तसेच, यापूर्वी प्रसिध्­द करण्­यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्­तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे उपलब्­ध करुन देण्­यात आलेली आहे.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्­तरीय अधिकारी व मतदान मदत केंद्र येथे (वोटर हेल्प सेंटर) मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातील. तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठीकिंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीhttps:/Voters.eci.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.  तरी लातूर जिल्ह्यातील १ जुलै  रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन आणि आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपले नाव मतदार यादीमध्­ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR