लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात एकुण सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे मांजरा, तेरणा व रेणा या तीन्ही नद्यांवरील धरणांचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. परिणामी या तीन्ही नद्यांवरील एकुण २७ बराजेस पैकी १६ बराज पुर्णक्षमतेने भरले आहेत. या तीन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
मांजरा नदीवर वांजरखेडा, टाकळगाव, वांगदरी, कारसा पोहरेगाव, साई, नागझरी, शिवणी, खुलगापूर, बिंदगीहाळ, डोंगरगाव, धनेगाव, होसूर व भूसणी अशा १५ ठिकाणी बराज बांधण्यात आले आहेत. या १५ बराजपैकी साई, नागझरी, शिवणी, खुलगापूर, बिंदगीहाळ, होसूर आणि भूसणी हे सात बराज पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. लासरा बराजमध्ये ४१.८० टक्के, बोरगाव अंजनपुर बराजमध्ये ०.००, वांजरखेडा बराजमध्ये ९९.९७ टक्के, टाकळगाव बराजमध्ये ७४.९० टक्के, वांगदरी बजरामध्ये ९९.२९ टक्के, कारसा पोहरेगाव बराजमध्ये ९६.७७ टक्के, डोंगरगाव बराजमध्ये ९९.९७ टक्के तर धनेगाव बराजमध्ये ८३.३५ टक्के पाणीसाठा आहे.
तेरणा नदीवरील सात बराज पैकी राजेगाव, किल्लारी, लिंबाळा, गुंजरगा, औराद शहाजानी व तगरखेडा या हे सहा बराज पुर्णक्षमतेने भरलेले आहेत. तर मदनसूरी बराजमध्ये ७५.२० टक्के पाणीसाठा आहे. रेणा नदीवरील घनसरगाव व रेणापूर व खरोळा हे तीन्ही बराज शंभर टक्के भरले आहेत. तेरणा नदीवरील किल्लारी कुमठा बराजमध्ये १६.७४ टक्के तर सोनखेड बराजमध्ये १६.४० टक्के पाणीसाठा आहे. मांजरा, तेरणा व रेणा नदीवरील एकुण २७ बराजमध्ये ६९.६६६ दशलक्ष घनमीटर पाणीसााठा म्हणजेच ८९.८७ टक्के पाणीसाठा आहे.