24.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeलातूर२ हजार कोटींपेक्षा अधिकच्या विकास योजना

२ हजार कोटींपेक्षा अधिकच्या विकास योजना

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील, २८ गावे आणि  १८ प्रभागात राबवण्यात आलेल्या  विविध विकास कामांचे भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन माजी मंत्री व लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने लातूर तालुक्यातील वासनगाव येथील कार्यक्रमात उपस्थित राहून केले. आधी केले मग सांगितले या उक्त्तीचा प्रत्यय देत, मागच्या ५ वर्षात लातूर मतदार संघात २ हजार कोटी रुपये अधिक निधीच्या विविध विकास योजना राबवण्यात आल्या आहेत, यात समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
लातूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, विकासरत्न विलासराव देशमुख आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांनी लोकांची बांधिलकी जपत, या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे, तीच बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न मी पुढे चालू ठेवला आहे, असे सांगून त्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा कायम कायम मिळत राहील, असा विश्वास व्यक्त्त केला. लोकसेवेचा वसा पुढे नेत असताना नेहमीच पारदर्शक कारभार करण्यावर भर दिला आहे. लातूरच्या प्रगतीला चालना देण्यासाठी येथील सामाजिक सलोखा आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ही प्रयत्न केला आहे. आजवर जे काम केले आहे त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडून  भविष्यात लातूर शहर मतदार संघात आणखीन काय करायला हवे याच्या सूचना जनतेकडून मागवण्यात येणार आहेत. जनतेच्या सूचना हाच या मतदारसंघासाठी आपला जाहीरनामा असणार आहे,  असे सांगून होऊ घातलेल्या  निवडणुकीत  जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभेवर फडकवण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती  त्यांनी केली.
यावेळी पूढे बोलतांना अमित देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आली. यातून आपल्या राज्याला सांभाळून पुन्हा उभे करण्याचे काम सरकारने केले. सर्व पूर्वपदावर येत असतानाच राजकीय घडामोडी घडल्या व महायुतीचे सरकार आले. मात्र हे सरकार आल्यापासून सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी, युवक, महिला, व्यापारी, उद्योजक असा कोणताही घटक समाधानी नाही. लोकसभेला मराठी जनतेने महाराष्ट्र धर्म दाखवून आघाडीला भरभरुन यश दिले आहे. विधानसभेलादेखील मराठी जनता पाठीशी राहील हा विश्वास आहे.
वासनगाव येथील कार्यक्रमाला लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, माजी जिल्हा परिषद सदस्य सोनाली रमेश थोरमोटे (पाटील), ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, वासनगावचे सरपंच रमेश थोरमोटे (पाटील), उपसरपंच  लक्ष्मण मारटकर, ग्रामपंचायत अधिकारी एस .सी. बसर्गी, श्रीकृष्णा थोरमोटे, माजी सरपंच पुष्पाताई थोरमोटे(पाटील), अनंत बारबोले, रघुनाथ मस्के, तुळशीदास आलूरे, भागवत साळुंखे, विठ्ठल डुरे, हरिदास बोकडे, सुखदेव थोरमोटे  आदीसह वासनगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तिस-यांदा आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
या सरकारमध्ये त्यांना मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. मत्री पदाच्या काळात आणि आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदार संघात २१०० कोटीपेक्षा अधिकचा विकासनीधी खर्च केला. महत्वाचे प्रकल्प यामध्ये त्यांच्या या कार्यकाळात महत्वाची अनेक काम झाली आहेत. यामध्ये पाणी नियोजनासाठी सन २०५५ पर्यंतचे नियोजन, नवीन पाणीपुरवठा योजनेचे वाढीकरण-निधी २५९.२२ कोटी, आरोग्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र आणि बाल रुग्णालय (दोनशे खाटांचे), आरोग्य तपासणी केंद्र (मोहल्ला क्लिीनीक), शहर सुशोभिकरण भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन व रस्ते योजना- निधी ३०५.१९ कोटी, कचरा व्यवस्थापण प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा शुद्ध कार्यक्रम अंतर्गत मुलभुत सुवीधा, वर्टिकल गार्डन झ्र कारंजे – निधी १३ लाख ११ हजार, रस्त्याचे नूतनीकरण पीव्हीआर चौक ते गरुड चौक, एक हजार कोटी रुपये खर्चाच्या नवीन बा  वळण रस्त्यासाठी भूसंपादन पूर्ण, विकासरत्न विलासराव देशमुख मार्ग – निधी ५ कोटी १५ लाख, श्री सिद्धेश्वर मंदीर, प्राचीन केशवराज मंदीर, रामलिंगेश्वर मदीर, जैन मदीर, प्राचीन गंगादेवी मंदीर, गंगापूर, हजरत सुरत शहावली दर्गा येथे विविध विकासकामे, अभिनव प्रकल्पातर्गत-शहरातील ओढे, नाले खोलीकरण-८५ लाख, शहर सुशोभिकरण व सौंदर्यीकरण अंतर्गत झ्र रवींद्रनाथ टागोर गार्डन, महात्मा गांधी गार्डन विकसीत करण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी ग्रीन बेल्ट विकासीत करण्यात आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विविध सोयीसुविधा करुन सुसज्ज – ५०० कोटी, महाविद्यालयात नवीन सुसज्ज बाहयरुग्ण तपासणी केंद्र इमारत, महाविद्यालयात मुलामुलींचे नवीन वसतीगृह – ४ कोटी, अल्पसंख्यांक मुलामुलींसाठी वसतीगृहे,कृऊबाकडून शेतक-यांंच्या मुलींसाठी रा्ष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब वसतीगृह – निधी ७ कोटी, सारथी संस्थेचे उपविभागीय कार्यालय – १७३ कोटी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह, ग्रंथालय, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह मंजूर लवकर सुरू होणार, महिलांसाठी मोफत बससेवा, ई बससेवा लवकरच, अदययावत शादीखानाची ऊभारणी – १० कोटी ८५ लाख, शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा, आंतरराष्ट्रीय दर्जाची अदययावत बाजारपेठ उभारणी निधी २६० कोटी, बेघरांसाठी निवारा केंद्र यासह विविध विकासकामे करण्यात आली आहेत. २८ गावात १७० कोटी तर १८ प्रभाग ३८९ कोटी रुपयाचा विकासनीधीतून विविध विकासकामे लातूर शहर मतदार संघातील २८ गावे आणि १८ प्रभागात नियोजनपूर्व विकासयोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन रस्ते, नाल्यांची बांधकामे, शाळा, अंगणवाडींची दुरुस्ती, स्मशानभूमीत सुवीधा, पाणी पुरवठा योजना, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, पाणीपुरवठासाठी पाण्याची टाकी पाईप लाईन, नळजोडणी करुन पाणीपुरवठा योजना राबवून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामविकास सोयीसुवीधा करीता गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण, सिमेंट कॉक्रीटीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. गावअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते आणि पेव्हर ब्लॉक रस्ते बांधले. गावअंतर्गत सिंमेट कॉक्रीट नाली आणि इतर भागात बंदीस्त नाल्यांचे बांधकाम, जिल्हा परिषद शाळा वर्गखोली बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृह, अंगणवाडी नवीन इमारत, अंगणवाडी खोल्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना चांगले वातावरण उपलब्ध करुन दिले. विद्युतीकरणातर्गत गावात नवीन विद्यूत लाईन टाकली, नवीन रोहीत्र बसवीले, रोहीत्र क्षमतावाढ केली, आवश्यक पोल बदलले विद्युतीकरण करून ग्रामस्थांना विद्युत पुरवठा  सुरळीत करून देण्यात आला. मुलभुत सुवीधा उपलब्ध करुन देण्यासाठी सांस्कृतिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण, नवीन गाळे बांधकाम सुवीधा करण्यात आल्या आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करुन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR