लातूर : प्रतिनिधी
रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांचे संरक्षण करण्यासाठी दि. १५ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. प्रधानमंत्री विमा योजनेतंर्गत पिक विमा भरण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी उरला आहे. आज पर्यंत जिल्हयातील २ लाख ८५ हजार २९१ शेतक-यांनी सहभाग नोंदवत १ रूपया प्रमाणे २ लाख ८५ हजार २९१ रूपयांचा पिक विमा भरला आहे.
यावर्षी जिल्हयात परतीच्या पावसानंतर गेल्या दिड महिण्यापासून शेतकरी शेतीच्या मशागत करून रबीची पेरणी करत आहेत. जिल्हयात २ लाख ८० हजार ४३९ हेक्टर रबीचा पेरणीचे क्षेत्र उपलब्ध असून ३ लाख २९ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर रबीचा पेरा झाला आहे. यात ज्वारीचा २१ हजार २४६ हेक्टरवर, गहू ११ हजार १९४ हेक्टर, मका १ हजार २०५ हेक्टर, हरभरा २ लाख ७३ हजार ९२३ हेक्टर, करडई १० हजार ५७७ हेक्टर, सुर्यफूल ५२ हेक्टर, जवस ७८ हेक्टर, तीळ, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा होत आहे.
रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी पिकांसाठी प्रधानमंत्री विमा योजनेतंर्गत १ रुपयात पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी व शेतक-यांना ऑनलाईन पिक विमा भरण्यासाठी दि. १५ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. आजपर्यंतत जिल्हयातील २ लाख ८५ हजार २९१ शेतक-यांनी ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचा विविध बँकेत एसबीआय कंपणीचा पिक विमा उतरवला आहे.